भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या आकडेवारीने वाढवली चिंता
पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. विशेषत: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने त्याचा परिणाम इंधन आणि सोन्याच्या बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. विशेषत: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने त्याचा परिणाम इंधन आणि सोन्याच्या बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेल, तेल खरेदीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. यानंतर उच्च स्तरीय नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतातील ऊर्जा साठ्यांबाबत माहिती दिली आहे.
मंत्री राजनाथ सिंह तसेच इतर नेत्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, “भारतात इतर देशांसारखी परिस्थिती नाही. भारताकडे ऊर्जा स्त्रोतांचा पुरेसा साठा आहे, फक्त नागरिकांनी योग्य रितीने याचा वापर केला तर चणचण भासणार नाही.” यानंतर काही आकडे समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताकडे कच्चं तेल पुढच्या 60 दिवस वापरता येईल इतका आहे. तर, LPG गॅसचा पुढच्या 45 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे.
Published on: May 12, 2026 02:58 PM
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

