मोठी बातमी! पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तब्बल 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सर्वसामान्यांनी जाणून घेण्यासारखे मुद्दे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नेदरलँड दौरा केला. यानंतर भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील संबंध आता अधिक मजबूत होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यात डच पंतप्रधान रॉब जेटीन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीनंतर संरक्षण, व्यापार, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश आणि क्वांटम कंप्युटिंगसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी तब्बल 17 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दोन्ही देशांनी ‘सामरिक भागीदारी आराखडा’ सुरू करत संबंधांना नवी दिशा दिली आहे.या युद्धजन्य स्थितीमध्ये दोन्ही देशाचे मैत्रिपूर्ण संबंध अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या भेटीत हरित हायड्रोजन विकासासाठीही संयुक्त आराखड्याला मंजुरी देण्यात आली. नेदरलँड्स हे युरोपमधील भारताचे महत्त्वाचे व्यापारी भागीदार मानले जाते. याआधी 2024-25 मध्ये दोन्ही देशांतील व्यापार 27.8 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नेदरलँड दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला तसेच नेदरलँड्समधील काही प्रसिद्ध ठिकाणांनाही भेट दिली.
Published on: May 18, 2026 02:05 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता