India-Pakistan Conflict : पाकिस्तानची आणखी कोंडी होणार, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक पाण्यासाठी व्याकूळच
काबूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि देशात राहणाऱ्या सुमारे २० लाख लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. ही नदी हिंदूकुश पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवेश करते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष कायम असून भारताकडून पाकिस्तानची पाण्यासाठी आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण भारत आता पाकची पाणी कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर आता अफगाणिस्तानातून भारत पाकिस्तानची कोंडी करणार असल्याचे म्हटलं जात आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारे पाणी अफगाणिस्तान अडवणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाची यासंदर्भात फोनवरून चर्चा झाली आहे. १५ मे रोजी संध्याकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांच्यातील फोनवरील संवादामुळे पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हल्ल्याप्रमाणे पुन्हा एकदा धडकी भरली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगितच ठेवण्याच्या भारताच्या निर्णयानं पाक आधीच नाराज आहे. अशातच भारत आणि अफगाणिस्तानमधील राजकीय संवादाने पाकचं टेन्शन आणखी वाढवले आहे. या चर्चेवरून पाकिस्तानची पाणी कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

