AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, कोण मारणार बाजी?

उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, कोण मारणार बाजी?

| Updated on: Sep 09, 2025 | 10:04 AM
Share

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार पी. सुदर्शन रेड्डी यांच्यातील ही चुरशीची लढत आहे.

आज भारत देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे पी. सुदर्शन रेड्डी यांच्यातील ही लढत आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी 5 वाजता संपले. एकूण 782 मतदारांपैकी 391 मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे 422 आणि इंडिया आघाडीकडे 312 खासदारांचे समर्थन आहे. मात्र, 48 तटस्थ खासदारांच्या भूमिकेमुळे निकाल अंदाज करणे कठीण आहे. दोन्ही आघाड्यांनी खबरदारी घेत खासदारांना गटांमध्ये विभागून मतदान करण्यास पाठवले. गुप्त मतदानामुळे क्रॉस व्होटिंगचीही शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी 6 वाजता निकाल जाहीर होईल.

Published on: Sep 09, 2025 09:48 AM