Champions Trophy 2025 : आज IND vs PAK हायव्होल्टेज महामुकाबला, भारताच्या विजयासाठी कुठं बजरंगबलीला साकडं तर कुठं होमहवन
आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आज 22 फेब्रुवारी रोजी दोन तगडे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार असल्याने किक्रेटप्रेमींना या सामन्याची प्रतिक्षा आहे.
संपूर्ण देशभरात आज क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज महामुकाबल्याची उत्सुकता आहे. आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आज 22 फेब्रुवारी रोजी दोन तगडे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार असल्याने किक्रेटप्रेमींना या सामन्याची प्रतिक्षा आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार असून देशासह राज्यभरात भारतीय संघाच्या विजयासाठी क्रिकेट प्रेमींनी देवाकडे धावा करण्यास सुरूवात झाली आहे. अशातच नागपूर येथील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आजच्या सामन्यात भारतीय टीम जिंकावी यासाठी नागपुरात होमहवन केलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे तर बजरंगबलीला देखील साकडं घालून भारतीय संघाच्या विजयासाठी सकाळपासूनच पूजा करण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील हा तगडा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करत दमदार अशी सुरुवात केलीय. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव आपल्या पदरी पाडून घ्यावा लागला आहे. बघा नागपुरातील क्रिकेटप्रेमींमध्ये कसा उत्साह आहे?
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

