AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानच्या हनुमानगडमध्ये वायुसेनेचं MiG-21 कोसळलं अन्...

राजस्थानच्या हनुमानगडमध्ये वायुसेनेचं MiG-21 कोसळलं अन्…

| Updated on: May 08, 2023 | 12:02 PM
Share

VIDEO | राजस्थानच्या हनुमानगड येथे मिग 21 हे विमान कोसळलं, या दुर्घटनेत दोन ग्रामस्थांचा मृत्यू तर....

जयपूर : राजस्थानच्या हनुमानगड येथे वायूसेनेचं मिग २१ (MiG-21) विमान कोसळलं आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला आणि तो सुखरूप आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य करण्यात सुरूवात केली. हे हवाई दलाचं विमान सूरतगडला जात होतं. विमानात बसल्याने अपघात होणार असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने तात्काळ पॅराशूट घालून विमानातून उडी मारली. त्यामुळे विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहे. मात्र हे विमान नंतर राजस्थानच्या हनुमानगड येथे कोसळलं. अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. विमानाच्या ढिगाऱ्यातून आग आणि धूर निघत होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून परिसरात घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली आहे.

Published on: May 08, 2023 11:56 AM