Operation Sindoor : एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण? व्योमिका सिंह अन् सोफिया कुरेशी यांनी मुल्ला मुनीरला पाडलं तोंडघशी
भारतीय सैनेच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी स्ट्राइकची माहिती दिली आहे. विंग कमांडर व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकची माहिती देणाऱ्या दोन महिला अधिकारी चर्चेत आहेत.
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक महिलांच्या कपाळावर कुंकू पुसलं. त्या सिंदूरची किंमत काय असते याच उत्तर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून दिलं आहे. भारतीय सेनेने कट्टरता आणि दहशतवाद्यांच्या कशा नांग्या ठेचल्या हे जगाला महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारताने कसा एअर स्ट्राइक केला हे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितलंय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्करी कारवायाची माहिती सैन्याच्या महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कर्नल सोफिया कुरेशी
कर्नल सोफिया कुरेशी भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. सोफिया यांच्या आजोबा देखील सैन्यात होते. सोफिया यांचे पती देखील सैन्यात आहेत. बायोकेमिस्ट्री विषयातून त्यांनी पदवी मिळवली आहे. मुळ गुजरातच्या सोफिया 1999 साली सैन्यात दाखल झाल्या. बहुराष्ट्रीय सराव फोर्स 18 मध्ये भारताकडून नेतृत्व करणाऱ्या सोफिया पहिल्या महिला अधिकारी राहिल्या. 2006 मध्ये काँगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी देखील त्यांनी काम केलंय.
विंग कमांडर व्योमिका सिंह
विंग कमांडर व्योमिका सिंह 2019 ला सैन्यात दाखल झाल्या. त्यांनी इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केला आहे. सैन्यात दाखल झालेल्या कुटुंबातल्या त्या पहिल्याच सदस्य आहेत. अतिजोखमीच्या भागात त्यांना पायलट म्हणून अनुभव आहे. माहितीनुसार त्यांनी आजपर्यंत 2500 हून अधिक तास उड्डाण केला आहे. काश्मीर आणि ईशान्येकडच्या अवघड भागांमध्ये त्यांनी चेतक आणि चिता हे हेलिकॉप्टर चालवली आहेत. 2020 मधल्या अरुणाचलच्या मोहिमेचे नेतृत्व व्योमिका सिंह यांनी केला आहे.
Published on: May 08, 2025 07:51 AM
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
