Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचे हे 3 मोठे शिकार अन् 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
भारतानं पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे मोठे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने हा हवाई हल्ला केला आणि पहलगामचा बदला घेतला
पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ असे एकूण ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरमुळे मध्यरात्रीच पाकड्यांची झोप उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या या हवाई स्ट्राईकमुळे पंजाबमधील लाहोर ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत चांगलाच हाहाकार माजला. गेल्या २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे एकूण पाच टॉप कमांडरचा खात्मा झाला आहे. तर ऑपरेश सिंदूरचे तीन मोठे शिकार ठरलेल्यांची नावं फोटोसहित समोर आले आहेत. भारतीय सैन्याकडून हवाई हल्ला करत बहावलपूरमधील मसूद अजहर जो जैश हेडक्वॉर्टर नेस्तनाबूत केलंय. यासह मुरीदके येथील लष्कराचा प्रमुख हाफिज सईद याचा अड्डा देखील उद्ध्वस्त केलाय. यासोबतच सियालकोट येथील हिजबूलचे कॅम्प टार्गेट सल्लाहुद्दीन याची देखील या हल्ल्यात शिकार झाली आहे.
Published on: May 07, 2025 01:33 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
