Masood Azhar : मीही मेलो असतो तर बरं…, ऑपरेशन सिंदूरमध्ये संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताने पाकिस्तानसह पीओकेत हल्ला केला आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेश सिंदूर अंतर्गत मध्यरात्री हे सगळं घडलं. भारताने पाकवर केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि हाफिज सईदची ९ ठिकाणं उद्धवस्त कऱण्यात आली.
भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. ऑपरेश सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि हाफिज सईदची ९ ठिकाणं उद्धवस्त कऱण्यात आली. भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या तळावर होता. ते जैशचं मुख्यालय उद्धवस्त करण्यात आलंय. यामध्ये तो राहत असल्याचे सांगितले जातेय. मात्र भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब ठार झाले आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने मसूद अजहरच्या घरावर हल्ला केला आहे, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरनेही यावर एक निवेदन जारी केले असून त्यात त्याने म्हटले की माझ्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गमावल्याची माहिती समोर येतेय. अशाचत आपल्या माणसांना गमावल्यानतंर मसूद अजहरचं एक वक्तव्य समोर आले आहे. ‘मीही मेलो असतो तर बरं झालं असतं’, असं मसूद अजहरने म्हटले आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब, त्याच्या भावा आणि बहिणीसह, भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नष्ट झाल्याची माहिती समोर येते आहे.
Published on: May 07, 2025 12:21 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
