Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; हल्ल्यातील 2 अतिरेक्यांचे घरं बॉम्बने उडवले
Jammu Kashmir pahalgam terror attack : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने या हल्ल्यातील अतिरेक्यांवर मोठी कारवाई केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हा हल्ल्याचा तपास सुरू केला असून पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावे संशयित म्हणून समोर आली आहेत. पहलगाम हल्ल्यातील या संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल ठोकर या दोघांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने हे घर बॉम्बने उडवलं आहे. सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर होते ते स्फोट घडवून उडवण्यात आले आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले.

इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..

सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय

VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
