Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल अॅक्शनमोडमध्ये, पाच दहशतवाद्यांची सात घरं जमीनदोस्त
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाकडूनही पाऊलं उचलली जात आहे. स्थानिक दहशतवाद्यांना कायमचा धडा देण्याकरता शोपिया-पुलवामा-कुलगाममध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतावादी हल्ल्यानंतर भारतकडून कठोर पाऊलं उचलली जात आहे. अशातच आता भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कसून शोध घेऊन त्यांना ठार करण्यात येत आहे. याकरता भारतीय सैन्याकडून व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना भारतीय सैन्य दलाकडून चांगलाच दणका देण्यात आलाय. कालपासून एकूण पाच दहशतवाद्यांची सात घरं जमीनदोस्त केल्याचे पाहायला मिळाले. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियाम भागात भारतीय सैन्य दलाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. काल दोन तर आज तीन दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करत पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त केली आहेत.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग

