Gaurav Bidhuri : ‘पाकच्या 93 हजार सैनिकांचे आत्मसमर्पण अन्…’, क्रिकेटर धवननंतर शाहिद आफ्रिदीला कुणी सुनावलं?
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निर्लज्जपणाची पातळीच ओलांडली असल्याचे पाहायला मिळाले. शाहिद आफ्रिदीने या हल्ल्यावर लाजिरवाणे वक्तव्य करत त्याने भारतावर गंभीर आरोप केला आहे. यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठवली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने एक वादग्रस्त विधान केले होते. त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि भारतीय सैन्याविरुद्ध अपशब्द वापरले. पहलगाम हल्ला भारताने घडवून आणला आहे, असं आफ्रिदी म्हणाला होता. इतकंच स्वतःच हल्ला करून भारताने पाकिस्तानकडे बोट दाखवलं आहे, असं संतापजनक वक्तव्यही त्याने केलं होतं. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने त्याला चोख उत्तर दिले. धवनने आफ्रिदीवर प्रत्युत्तर देत त्याला कारगिल युद्धाची आठवण करून दिली. यानंतर आता जागतिक अजिंक्यपद पदक विजेता बॉक्सर गौरव बिधुडीनेही आफ्रिदीला चांगलंच सुनावलं आहे. १९७१ च्या युद्धात ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केल्याची आठवण त्याने आफ्रिदीला करून दिली.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

