Indrayani River Accident : पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला, एनडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू
कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेनंतर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातल्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम याठिकाणी दाखल झालेली आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक नागरिक वाहून गेलेले आहेत. वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, अंधार पडण्यास सुरूवात झालेली असल्याने बचाव कार्याला वेग आलेला आहे. काही नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलेलं आहे. तर कोसळलेल्या पूलात देखील काही लोक अडकून पडलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी लोखंडी पूल कापून बचावकार्य केलं जात आहे. अडकून पडलेल्या पर्यटकांनी घाबरून एनडीआरएफच्या जवानांच्या पायाला घट्ट पकडून ठेवलेला एक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे परिस्थितीची भयानकता यातून कळून येत आहे.