Indurikar Maharaj Quits : आता बस्स थांबणार… कंटाळलोय… इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार? बघा नेमकी काय व्यक्त केली खंत?
इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यांच्या खरेदीवरून झालेल्या ट्रोलिंगवरून नाराजी व्यक्त करत आपली खंत बोलून दाखवली आणि टीका करणाऱ्यांना लाज बाळगण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी किर्तन थांबवण्याचे संकेत दिलेत.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे व्यथित होऊन लवकरच कीर्तन थांबवणार असल्याची खंत व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराजांनी जुन्नर येथील कीर्तनात आपल्या भावना बोलून दाखवल्यात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंदूरीकर महाराज चांगलेच चर्चेत आहे. मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यांच्या खरेदीवरून ट्रोलर्सनी त्यांना जोरदार ट्रोल केलंय. या ट्रोलिंगवर इंदूरीकर महाराजांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. “बस्स झालं आता मी कटाळलो महाराज. मी जवळजवळ आता दोन-तीन दिवसात एक क्लिप टाकणार आणि थांबून घेणार आहे आता. बस्स झाले ३१ वर्षे,” असे म्हणत त्यांनी कीर्तन थांबवण्याचे संकेत दिले. आयुष्यात चांगलेच केले, पण त्याचे फळ माझ्यापर्यंत ठीक होते, ते घरादारापर्यंत जायला नको होते, असे त्यांनी म्हटले.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

