INS Ranveer blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान शहीद

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 18, 2022 | 11:07 PM

मुंबई : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या (INS Ranveer Blast) युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच स्थानिक नौदल रुग्णालयात जखमी झालेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृत सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें