Bhandara Petrol Issue | इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा परिणाम; महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत पेट्रोलची टंचाई जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरात पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत पेट्रोलची टंचाई जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरात पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पेट्रोल मिळवण्यासाठी काल रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत म्हणजेच 12 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात पेट्रोलचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जागतिक घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे बोलले जात असून, येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 25, 2026 04:11 PM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

