‘या’ इंग्रज कालीन हॉस्पिटलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव, रात्री १२ वाजता नामांतरण
VIDEO | 95 वर्षांपूर्वी इर्विन नामक इंग्रज अधिकाऱ्याने स्थापना केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळणार
अमरावती : 95 वर्षांपूर्वी इर्विन नामक इंग्रज अधिकाऱ्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना केली होती. त्यांनी त्याचं नाव इर्विन हॉस्पिटल दिलं होत. त्याला आता 95 वर्षे पूर्ण झाली असून आता त्या रुग्णालयाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देणार आहे. अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली असून तसा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य सहसंचालक मुंबई यांना पाठवलेला असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. तर आज रात्री बारा वाजता जिल्हा रुग्णालयाच्या फलकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं फलक लावून नामांतरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

