दादरच्या समुद्रातून उभारण्यात येणार संविधान पथ, बघा पहिली झलक
VIDEO | दादर चैत्यभूमी ते इंदूमीलमधील स्मारकापर्यत संविधान पथ उभारणार, कस असणार बघा झलक
मुंबई : दादर चैत्यभुमी ते इंदुमील स्मारकाला जोडण्यासाठी संविधान पथ उभारण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संकल्पनेतून हा पथ तयार करण्यात येणार आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संविधान पथाचे भूमीपूजन होणार आहे. ३० मिटर रुंद आणि ५५० मीटर लांब असं भव्य संविधान पथ उभारण्यात येणार आहे. बघा या संविधान पथाची पहिली झलक टीव्ही ९ मराठीवर…. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उद्या मुंबई भाजपा तर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेझर शो वरळीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

