VIDEO |इस्रो प्रमुखांनी दिली पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 च्या प्रक्रियेची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषद संपताच थेट बेंगळुरू गाठलं. तसेच आज त्यांनी इस्रो शास्त्रज्ञांनी घेतलेल्या परिश्रमांवर गौरवद्गार काढले. त्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्याची माहिती देखील घेतली.
बेंगळुरू : 26 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग येथील ब्रिक्स परिषद संपताच माय देशी परतले. पण ते दिल्ली येथे न जाता थेट बेंगळुरूला जाणं पसंत केलं. यावेळी त्यांचे तेथे जोरदार स्वागत करण्यात आलं. तर सकाळीच ते येणार असल्याने ६ वाजल्यापासून जनता त्यांची वाट पाहत होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना, शास्त्रज्ञांबाबत गौरवद्गार काढले.
तसेच ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’चा नारा दिला. यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयात जाऊन चांद्रयान-३ च्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी इस्रो प्रमुखांना मिठी मारली आणि त्यांच्या पाठीवर थाप दिली. यावेळी तेथील इस्रो सेंटरमध्ये असणाऱ्या चांद्रयानचे संपूर्ण मॉडेल शास्त्रज्ञांनी पंतप्रधान मोदी यांना दाखवले. तर इस्त्रो प्रमुखांनी चांद्रयान-३ मोहिमेतीच्याबाबत त्यांना माहिती दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

