Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले…
राष्ट्रवादीच्या शिबिरातून छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे नाही तर थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं तर चूक कसं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला.
कर्जत, १ डिसेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज कर्जत येथील राष्ट्रवादीच्या शिबिरातून जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे नाही तर थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं तर चूक कसं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केला. आम्ही भाजपच्या सरकारमध्ये गेलो. त्याआगोदर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. आम्ही आमची विचारधारा बदलली का? नाही. तिकडे बसलो तर चालतं. इकडे बसलं तर नाही चालत का? तुम्ही केलं ते बरोबर. आम्ही केलं ते चूक, हे कसं काय? असा सवाल करत जाबच विचारला आहे.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.

