Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची चौकशी, नेमकं प्रकरण काय आहे?

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर तपासात सामील होणार आहे. याआधी ईडीने जॅकलिनला तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. पण, अभिनेत्री कामाचा हवाला देत पोहोचली नव्हती.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर तपासात सामील होणार आहे. याआधी ईडीने जॅकलिनला तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. पण, अभिनेत्री कामाचा हवाला देत पोहोचली नव्हती.  पण, अभिनेत्री कामाचा हवाला देत पोहोचली नव्हती. सोमवारी ती या तपासात सामील होऊ शकते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. शनिवारी, जॅकलिनला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती आली नाही आणि पुढच्या आठवड्यात हजर राहू असे सांगितले. तसेच, अभिनेत्रीला मागील तीन वर्षांच्या बँक स्टेटमेंट आणि आर्थिक व्यवहारांसह ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.

16 ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आले समन्स!

ईडीने जॅकलिनला 16 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले होते. वैयक्तिक कारणास्तव अभिनेत्रीने काही दिवसांची मुदतवाढ मागितली होती. यानंतर ईडीने 18 ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी तिसरा समन्स पाठवला होता. जॅकलिनला 30 ऑगस्टला ईडीने प्रथम बोलावले होते. त्या दरम्यान अभिनेत्रीची सुमारे 5 तास चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान सुकेश चंद्र शेखर याच्याबद्दल अनेक महत्वाची माहिती देण्यात आली. यानंतर, तिला 25 सप्टेंबरला बोलावण्यात आले, पण तरीही जॅकलिन हजार झाली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI