विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक विधान केलं. त्यामुळे वाद निर्माण झाला. यावर भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांवर त्यांनी टीका केली आहे. “मतांच्या लाचारीसाठी अजित पवारांनी धर्मवीर ही उपाधी काढून घेत आहेत. अजित पवारांनी इतिहास वाचला नसावा. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरचं होते. संभाजी महाराजांचा बलिदान दिवस धर्मवीर दिवस म्हणून घोषित करण्यात यावा”, असं जगदीश मुळीक म्हणाले आहेत.