
गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झालीये; एकनाथ खडसे भडकले
Eknath Khadse on Girish Mahajan : जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे मात्र सत्तेचा माज यांना आला आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
मुक्ताईनगर, जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे ग्रामविकास आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झाली आहे. महाजनांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मंदाकिनी खडसे आणि संचालकांवर दूध फेडरेशन गैरव्यवहारबाबत गुन्हे दाखल होणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दूध फेडरेशनमध्ये जर गैरव्यवहार असेल तर मी स्वतःच या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. मात्र मी केलेल्या तक्रारीची राजकीय दबावापोटी पोलिसात नोंद झालेली नाही, असंही खडसेंनी यावेळी सांगितलं.
Published on: Mar 29, 2023 12:20 PM
Related Video
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
दारू सोडण्यापासून जुन्या प्रेमापर्यंत, विजयने केला मोठा खुलासा
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
बुलढाणा:पावसाअभावी पिके करपली, दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपयांची सरसकट मदतीची मागणी
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला