सलग दोन दिवस गारपीटसह वादळी वाऱ्याने जळगावला झोडपलं; पिकांचं मोठं नुकसान
Jalgoan Unseasonal Rain : कुठे घराचे पत्रे उडाले तर कुठे उभी पिकं आडवी झाली; अवकाळी पावसामुळे जळगावात मोठं नुकसान, पाहा व्हीडिओ...
जळगाव : राज्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान होतंय. जळगावमध्येही अवकाळी पावसामुळे पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. भुसावळ सह अनेक तालुक्यात सलग दोन दिवस गारपीटसह वादळी वाऱ्यानं आणि पावसाने झोडपलंय. वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. अंदाजे हजारो हेक्टर जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. जळगावच्या साकेगावात तर जिल्हापरिषदेच्या शाळेचे पूर्ण छतच उडून गेलंय. तसंच इतरहील घरांचं नुकसान झालंय. अजूनही गाव खेड्यात विद्युत पुरवठा खंडित आहे. या पावसाने अनेकांचं छप्पर हिरावलं आहे.अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे तिसऱ्यांदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मुक्ताईनगर, बोदवड, जामनेरमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केळीची संपूर्ण पाने फाटली आहेत. काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यामुळ शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे.
Published on: Apr 29, 2023 09:28 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

