अजित पवार युतीत सहभागी होणार? गुलाबराव पाटील यांनी तिथी सांगितली…
Gulabrao Patil On Ajit Pawar : अजित पवार भाजप-शिवसेना युतीचा भाग होणार? गुलाबराव पाटलांनी 'तो' दिवस सांगितला. पाहा गुलाबराव पाटील काय म्हणालेत...
जळगाव : अजित पवार भाजप-शिवसेनेच्या युतीत सहभागी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यावर प्रतिक्रिया दिली आहे. लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते आणि तिथी लवकरच येणार आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. अजून कुळ बघावं लागेल गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केला आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

