Vaishnavi Hagawane : जालिंदर सुपेकरांवर 6 गंभीर आरोप, मेहुणे PI शशिकांत चव्हाणही गोत्यात अन्…
हगवणे कुटुंबाच्या निकटवर्तीया जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर 550 कोटी मागितल्याचा आरोप एका वकिलाकडून करण्यात आलेला आहे. कैदी असलेल्या गायकवाडकडे जामिनासाठी पैसे मागितल्याचा सुपेकर यांच्यावर आरोप आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर सुपेकर यांच्यावर सहा मोठे आरोप करण्यात आले.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर रोज नव नवीन आरोप होत आहेत. आतापर्यंत सुपेकर यांच्यावर सहा मोठे आरोप झाले. हगवणे कुटुंबाला पिस्तुलाचा परवाना मिळवून देण्याचा आरोप सुपेकारांवर झाला. सुपेकर यांनी कैद्यांना 300 कोटी रुपये मागितले असा आरोप धस यांनी केला.
अमरावतीच्या तुरुंगात असलेले कैदी गायकवाड यांच्याकडे सुपेकर यांनी 550 कोटींची मागणी केल्याचा आरोप वकील कराड यांनी केला. गायकवाड पितापुत्रांचं सोनं जप्त करताना सुपेकर यांनी 150 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कराड यांनी केला. सुपेकर यांनी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार केला असा आरोप राजू शेट्टींचा आहे. सुपेकर यांचे वादग्रस्त मेहुणे पीआय शशीकांत चव्हाण यांच प्रमोशन केल्यावरूनही सुपेकर यांच्यावर आरोप सुरू झाले. राजू शेट्टी यांनीही आयपीएस सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केला. कैद्यांसाठी आणलेल्या दिवाळी फराळातही सुपेकर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. बघा काय म्हणाले शेट्टी?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

