Pankaja Munde News : जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
Jalna Crime News : जालना येथील भोकरदनमध्ये तरुणाला क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
जालन्यातील मारहाण घटने प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. मारहाण करून व्हिडिओ काढणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
जालना जिल्ह्यात भोकरदन येथे मंदिरात का गेला म्हणून लोखंडी सळईने एका धनगर युवकास चटके दिल्याची घटना घडली होती, आरोपीने या अमानुष घटनेचा व्हिडिओ काढला आहे. या घटनेबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर बोलताना नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील निषेध व्यक्त करत अशा आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी असं म्हंटलं आहे. तसंच सदर घटनेत एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
Published on: Mar 05, 2025 07:13 PM
Latest Videos

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
