जालन्यात पावसाचा धुमाकूळ, शेताला तळ्याचं रूप; कपाशी-सोयाबीन पिकांचं नुकसान
मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. जालना जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढलं आहे.
रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी.
मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. जालना जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतात पाणी साचलं असून कपाशी पिकांचं नुकसान झालं आहे. शेतांमध्ये अक्षरश: गुडघाभर पाणी साचलेलं असल्याने शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.
जालना जिल्ह्यातल्या तीन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं असून कपाशी आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा

