Manoj Jarange यांच्या उपोषणाचा ९ वा दिवस, प्रकृती बिघडली अन् मुलगी म्हणतेय, ‘काळजी वाटतेय पप्पांची…’
VIDEO | जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस, प्रकृती खालवल्याने कुटुंब चिंतेत...टिव्ही ९ मराठीशी साधला पुन्हा संवाद
जालना, ६ सप्टेंबर २०२३ | जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी मराठा आंदोलकांवर भीषण लाठीचार्जची घटना घडली. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद बघायला मिळत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांची उपोषण मागे घ्यावे म्हणून मनधरणी केली मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान, आज सलग नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालवल्याचे समोर आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. यावर त्यांच्या मुलीने काळजी व्यक्त करत असे सांगितले तब्येतीची काळजी घ्या आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरू नका…असे म्हणत जरांगे यांच्या लहान मुलीने त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं

