tv9 Marathi Special Report | जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत बिघाडाचा प्रकार
जालना जिल्ह्यातील सामनगाव परिसरात जमिनीतून ज्वालामुखीसारखा उद्रेक होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जमिनीतून लाव्हारसासारखा द्रव बाहेर पडताना दिसत असल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि विविध चर्चांना उधाण आले आहे.
जालना जिल्ह्यातील सामनगाव परिसरात जमिनीतून ज्वालामुखीसारखा उद्रेक होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जमिनीतून लाव्हारसासारखा द्रव बाहेर पडताना दिसत असल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि विविध चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा प्रकार भूगर्भातील ज्वालामुखीच्या उद्रेकाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. मात्र, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही सक्रिय किंवा सुप्त ज्वालामुखी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात फक्त अंदमान-निकोबार बेटांवरील ज्वालामुखी हा अपवाद मानला जातो.
प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार विजेच्या खांबातील तांत्रिक बिघाडामुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विजेच्या खांबातून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्याने जमिनीतील माती, मुरूम आणि दगड उष्णतेमुळे वितळून लाव्हारसासारखा दिसणारा पदार्थ तयार होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारची घटना यापूर्वीही नांदेड जिल्ह्यात घडल्याची नोंद आहे. विशेषतः पावसाळ्यात विजेचा प्रहार किंवा विद्युत यंत्रणेमधील बिघाडामुळे जमिनीखालील घटक वितळण्याच्या घटना घडू शकतात. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Apr 07, 2026 11:21 AM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

