दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है…! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक

दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है…! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक

| Updated on: Feb 24, 2026 | 10:49 AM

जयंत पाटील अजित पवारांबद्दल बोलताना भावूक झाले. त्यांनी दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है... हे गाणे उद्धृत करत अजित पवारांसोबतच्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासाचे स्मरण केले. शरद पवारांचा अजित पवारांच्या कर्तबगारीवर प्रचंड विश्वास होता, असेही पाटील यांनी नमूद केले.

अजित पवारांबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील भावूक झाले. काल पार पडलेल्या शोक सभेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है हे प्रसिद्ध गाणे उद्धृत केले. जयंत पाटील यांनी नमूद केले की, त्यांनी आणि अजित पवारांनी जवळपास 38 वर्षे एकत्रित काम केले आहे. 1991पासून विधानसभेत एकाच वर्गात, शेजारी शेजारी बसून आम्ही एकत्र काम केले. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, ती आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली. पवार साहेब आणि अजित पवारांमध्ये एक खास नाते होते. पवार साहेबांचे अजित पवारांवर प्रचंड प्रेम होते. आज खरंच, पवार साहेबांचा अजित पवार हा हुकमी एक्का होता. शरद पवारांचा अजित पवारांच्या कर्तबगारीवर फार मोठा विश्वास होता, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Published on: Feb 24, 2026 10:49 AM
Follow Us