JItendra Awhad : ‘.. म्हणून त्याच्या डेरिंगला सलाम आहे’, राज ठाकरेंचं कौतुक करत आव्हाडांनी ठोकला सलाम
Jitendra Awhad On Raj Thackeray : जितेंद्र आव्हाड यांनी आज राज ठाकरे यांच्या महाकुंभवरील वक्तव्याची मिमीक्री करत त्यांनी हे बोलण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. आम्ही हे बोललो असतो तर आम्हाला देशद्रोही ठरवलं असतं असंही आव्हाड म्हणालेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याची टीका होत आहे. मात्र असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आज राज ठाकरे यांचं कौतुक केलेलं बघायला मिळालं. आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमीक्री करत असं बोलायला हिम्मत लागते, राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली, अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र आम्ही असं बोललो असतो तर आत्तापर्यंत यांच्या घरावर दगड आले असते, आमच्या विरोधात निषेध मोर्चे निघाले असते, आम्ही देशद्रोही सुद्धा ठरलो असतो, असंही आव्हाडांनी म्हंटलं आहे. भारतात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी राज ठाकरे यांचं अभिनंदन करेल की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिम्मत लागते. आम्ही बोलायला घाबरतो की आपल्या मागे लागतील हे, पण राज ठाकरे बिनधास्त बोलले आहेत, असं म्हणत त्याच्या डेरिंगला सलाम आहे, असं म्हणत आव्हाडांनी ठाकरेंना सलाम ठोकला.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका

विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
