चिकन आणि मटण शॉप बंद करण्याचा निर्णय! जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली येथील मास विक्री बंदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत चिकन आणि मटण शॉप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू कल्याण डोंबिवली पालिका बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड संतापले आहे. आज याबाबत पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली येथील मास विक्री बंदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना म्हटले, “हा कोणाचा बापाचा राज्य आहे का? लोकांनी काय खावे आणि काय विकावे यावर कायद्याने कोणतीही बंदी आहे का? हा कसला तमाशा आहे?”
आव्हाड यांनी बहुजन समाज मांसाहारी असल्याचे सांगताना, मानवाच्या दातांच्या रचनेतून त्याच्या मांसाहारी स्वभावाचा पुरावा दिला. ते म्हणाले, “हजारो वर्षांचा इतिहास आहे, माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली, आणि दातांची रचना पाहिली तर आपण मांसाहारी आहोत हे स्पष्ट होते.” त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील मास विक्री बंदीच्या विरोधात 15 ऑगस्टला मटण पार्टी आयोजित करण्याचे जाहीर केले आणि पोलिसांना अटकेचे आव्हान दिले.

