विधानभवनात राडा! पडळकर आणि आव्हाडांची एकमेकांना शिवीगाळ
विधान भवनाच्या गेटवर आज नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
मुंबईतील विधान भवनाच्या गेटवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आव्हाड यांनी आरोप केला की, पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा त्यांना लागला, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. या वादादरम्यान दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केल्याचे दिसून आले, आणि परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की दोन्ही नेते एकमेकांवर आक्रमकपणे तुटून पडले.
गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांवर सातत्याने टीका केली जाते. मात्र, आजच्या घटनेत आव्हाड आणि पडळकर यांच्यात थेट भांडण उफाळले. आव्हाड यांनी गाडीच्या दरवाज्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत म्हटले, हा काय बालीशपणा आहे? त्यांनी दरवाजाला लाथ मारली, आणि तो आम्हाला लागला. अशा छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतं? मी पुढे आलो, पण ही कुठली पद्धत आहे? मुंबईत आयुष्यभर राहिलो आहे, अंगावर गाड्या घालायच्या? व्हिडीओत सगळं दिसेल. यापूर्वीही असंच झालं होतं. जाणूनबुजून खोड काढायची? एवढा राग तुम्हाला का आहे? तुम्हाला इतकं का वाईट वाटतं? या घटनेमुळे विधान भवन परिसरात खळबळ उडाली असून, दोन्ही नेत्यांमधील हा वाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

