Jitendra Awhad on Ketaki Chitale : ‘ठेचून काढत नाही तोपर्यंत ही विषवल्ली वाढतच जाणार’, पवारांविरोधातील पोस्टचा जिंतेंद्र आव्हाडांकडून समाचार

पवार समर्थक, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 14, 2022 | 4:10 PM

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) फेसबुक पोस्टनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पवार समर्थक, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय. अशावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केतकीच्या पोस्टचा चांगलाच समाचार घेतलाय. आव्हाड म्हणाले की राजकीय टीकेचा राजकीय मुकाबला होऊ शकतो. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील हे देखील टीका करतात. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ही वैचारिक लढाई असते, ती आम्ही विचारानेच लढतो. मात्र, ‘पवारांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं, नरक मिळावा म्हणून प्रार्थना करणं हे एका स्त्रीला शोभा देत नाही’, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें