Maharashtra Top9 News | मोदींच्या आवाहनावरून विरोधक आक्रमक; आव्हाड घोड्यावर, पुण्यात वसंत मोरेंचं आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारवर निशाणा साधला. आव्हाड यांनी घोड्यावर बसून निदर्शने केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीतून प्रवास करावा, अशी मागणी केली. तसेच ठाण्याच्या महापौरांनी टीएमटी बसमधून प्रवास करावा, यासाठी त्यांनी महापौरांना पत्रही दिले आहे.

दरम्यान, पुण्यातही शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी महापालिकेसमोर घोड्यावर बसून आंदोलन केले. वाढते इंधन दर, आर्थिक परिस्थिती आणि सरकारच्या आवाहनांवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन करत, “मुख्यमंत्री यांनी वर्षा निवासस्थानातून मंत्रालयात जाताना घोडागाडी किंवा बैलगाडीतून जावेत आणि परत येताना घोड्यावरून प्रवास करावा,” असा टोला लगावला. या अनोख्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on: May 13, 2026 10:22 AM
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम