BJP आधी घाबरवतं मग मदतीचं आश्वासन देतं, Jitendra Awhad यांची केंद्रावर टीका-TV9
पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर (House) खाली करायला सांगता हे योग्य नाही. रेल्वे विस्तारीकरण होत असते तर मान्य होते मात्र केंद्र सरकारच्या (Central Government) जागेवर असलेल्या जागा खाली करायला सांगितले जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यानी केंद्र सरकारवर केला आहे.
ठाणे : ठाण्यातल्या झोपडपट्ट्यांवरून मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहेत. पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर (House) खाली करायला सांगता हे योग्य नाही. रेल्वे विस्तारीकरण होत असते तर मान्य होते मात्र केंद्र सरकारच्या (Central Government) जागेवर असलेल्या जागा खाली करायला सांगितले जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यानी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच कळव्यात अशाच पद्धतीने घर पाडण्यात येणार होती ती आम्ही पाडू दिली नाहीक आज त्या झोपड्या तशाच आहेत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. कळवा आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपटपट्टी आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडही विधानसभेत मुंब्र्याचे प्रतिनिधीत्व करतात, त्यामुळे तिथल्या घरांवरून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

