खळबळजनक अपडेट! मराठी तरुणीला मारहाण प्रकरणाचा नवा व्हिडीओ समोर..
कल्याणमध्ये काल मराठी तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणी आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
कल्याणमध्ये काल मराठी तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणी आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी ही आरोपी गोकुळ झा च्या वाहिनीला रुग्णालयात मारहाण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
कल्याण पूर्वमधील नांदिवली परिसरात एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने रुग्णालयातच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात रिसेप्शनिस्ट तरुणी ही गोकुळ झा याच्या वाहिनीला मारताना दिसत आहे. यानंतर गोकुळ झा त्या रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करत आहे, हे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका घटनेच्या आधीचा की नंतरचा याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

