Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पानमसाला व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाचा छापा
शंभर, दीडशे नव्हे तर तब्बल पावणे दोनशे कोटी कोटी रुपयांचा साठा सापडला. व्यापाऱ्याच्या घरातील कपाटांमध्ये रद्दी, कचरा भरावा त्याप्रमाणे खचाखच नोटा भरलेल्या आढळून आल्या. या नोटांची गणती अजूनही सुरूच आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर आणि कनौजमधील शिखर पानमसाला व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यात अफाट मोठ्ठं घबाड सापडलं. आयकर विभागाच्या मदतीने डीजीआय (जीएसटी इंटेलिजन्स महासंचलनालय) च्या टीमने या व्यापाऱ्याच्या घगरावर काल छापा (IT Raid) टाकला. शंभर, दीडशे नव्हे तर तब्बल पावणे दोनशे कोटी कोटी रुपयांचा साठा सापडला. व्यापाऱ्याच्या घरातील कपाटांमध्ये रद्दी, कचरा भरावा त्याप्रमाणे खचाखच नोटा भरलेल्या आढळून आल्या. या नोटांची गणती अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी या व्यापाऱ्याच्या घराची झडती घेण्यात आली. पियूष जैन यांचे पुत्र प्रत्यूष आणि प्रियांश जैन यांना अटक करण्यात आली असून अधिकारी पुढील तपास करत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

