कर्नाटक निकालानंतर राज्यात रंगला नवा कलगीतुरा; राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपसह शिवसेनाचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वावर सडकून टीका केली ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशासतसं उत्तर दिलं.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) भाजपचा दणदणीत पराभव झाला. तर काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ कानडी जनतेनं घातली. या पराभवामुळे भाजपवर देशभरातून टीका होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वावर सडकून टीका केली ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशासतसं उत्तर दिलं. ज्यामुळे राज्यात नवा कलगीतुरा रंगल्याचे समोर येत आहे. राऊत यांनी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे खेळणं, हे खुळखुळ आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाही, अशी टीका केली. त्यावर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, असे काही दिवाने मला पाहायला सध्या राज्यात मिळतात असा पलटवार फडणवीस यांनी केला. तर कुणाला कधी आनंद वाटेल माहित नाही. दुसऱ्याचं घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करताना देखील आपण पाहिलं. अरे पण स्वतःचं घर जळलं ते वाचवा पहिलं. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. त्यावरून आता नवा वाद रंगला आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

