कार्तिक आर्यनने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

चित्रपटाला चांगलं यश मिळावं यासाठी तो बाप्पापुढे नतमस्तक झाला आहे. अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 21, 2022 | 2:49 PM

अभिनेता कार्तिक आर्यनने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कार्तिकचा ‘भुल भुलैय्या 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानिमित्त त्याने मंदिराला भेट दिली आहे. चित्रपटाला चांगलं यश मिळावं यासाठी तो बाप्पापुढे नतमस्तक झाला आहे. अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी ‘भुल भुलैय्या 2’ने 14.11 कोटींची कमाई केली आहे. अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’च्या तुलनेत कार्तिकच्या या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें