‘त्या काय मला न्याय देणार?’ करूणा शर्मांचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांवर निशाणा
करूणा शर्मा यांनी रूपाली चाकणकरांवर हल्ला चढवलाय. रूपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या आहेत. मला काय न्याय देणार? असं वक्तव्य करूणा शर्मा यांनी केलं आहे. रूपाली चाकणकर यांची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार केली असल्याचेही करूणा शर्मा यांनी यावेळी सांगितले.
करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात निकाल दिला. तर करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये देण्याचे आदेश देत मोठा दिलासा दिला. यानंतर अनेकांच्या यासंदर्भात प्रतिक्रिया येत असताना करूणा शर्मा यांनी रूपाली चाकणकरांवर हल्ला चढवलाय. रूपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या आहेत. मला काय न्याय देणार? असं वक्तव्य करूणा शर्मा यांनी केलं आहे. रूपाली चाकणकर यांची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार केली असल्याचेही करूणा शर्मा यांनी यावेळी सांगितले. करूणा शर्मा म्हणाल्या ‘माझ्यावर दबाव टाकला जायचा किंवा काहीतरी माझ्यासोबत व्हायचं तेव्हा नेहमी महिला आयोगात जाऊन तक्रार केली आहे. पण महिला आयोगात रूपाली चाकणकर अध्यक्षा आहे. रूपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या आहेत. ज्या स्वतःच्या पक्षाला न्याय देऊ शकत नाही. त्या मला काय न्याय देणार’, असं म्हणत करूणा शर्मा यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, ‘करूणा शर्मा यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पण मला कळत नाही पॉलिटिकल मोटिवेशन म्हणजे किती असावं. एक स्त्री म्हणून त्यांना न्याय मिळणं गरजेचं नाही का?’ असा सवाल दमानिया यांनी केला. तर धनंजय मुंडे तुमच्या पक्षातील माणूस आहे म्हणून करूणा शर्मा यांना न्याय देणार नाही. पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले

विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?

नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
