Karuna Sharma Video : ‘मी समाधानी नाही, मला इतके रूपये…’, २ लाखांच्या पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?
“पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केलं आहे. करुण शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा. हा माझा अधिकार आहे, मी लढा दिला आहे. मी मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा” अशी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली.
करूणा शर्मांकडून मंत्री धनंजय मुंडेंवर झालेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. मुंडेंच्या विरोधातील कोर्टाच्या निकालानंतर करूणा शर्मा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरमहा दोन लाख रूपये पोटगी म्हणून देण्यात येण्याच्या आदेशावर करूणा शर्मांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मी समाधानी नाही. कारण महिन्याचा खर्च 1 लाख 70 हजार आहे. 30 हजार रुपये मेन्टेन्स आहे. एका नोकराकडे चार हजार कोटीची प्रॉपर्टी निघाली. माझ्या आणि मुलांच्या नावावर काही नाही. माझा मुलगा 21 वर्षांचा असून बेरोजगार आहे. आम्हाला महिन्याच्या खर्चासाठी 15 लाख रुपये हवेत. त्यासाठी कोर्टात खटला दाखल केलेला. मी कोर्टाच्या ऑर्डरवर समाधानी नाही. मी हायकोर्टात दाद मागणार असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या. तर तीन वर्षापासून मी लढाई लढत आहे. 33 महिन्यापासून मी खूप कष्ट घेतलेत. मी न्यायाधीश, न्यायालय आणि माझी वकील गणेश कोल्हे यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी एक रुपया न घेता माझा खटला लढला असेही त्यांनी म्हटले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
