Karuna Sharama Video : करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, ‘अजित पवार धनंजय मुंडेंना…’
'संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. याप्रकरणात सगळे पुरावे असूनही मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहेत', करूणा शर्मा नेमकं काय म्हणाल्या?
अजित पवार यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही कारण अजित पवार हे मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे, असं म्हणत करूणा शर्मा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यापुढे असेही म्हणाल्या, ‘बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या गोष्टीला हे पाठिंबा देत आहेत. या प्रकरणातील आरोपीला दोन महिने झाले तरी कृष्णा आंधळेला अद्याप अटक झाली आहे. मात्र एका माजी मंत्र्याचा मुलगा गायब झाला तर त्याचा शोध पोलीस यंत्रणा तीन तासात घेते. पण संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. याप्रकरणात सगळे पुरावे असूनही मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहेत’, असंही करूणा शर्मा यांनी म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने धनंजय मुंडे यांना करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात खरी माहिती दडवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. आता याच तक्रारीवरून मंत्री धनंजय मुंडे यांना परळीच्या फौजदारी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिल्याची माहिती आहे.