पुण्यातील मावळमधील कासारसाई धरणानं धोक्याची पातळी ओलांडली
पुण्यातील मावळमधील कासारसाई धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हे धरण 87.71 टक्के भरलंय. धरणाच्या तिनही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुण्यातील मावळमधील कासारसाई धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हे धरण 87.71 टक्के भरलंय. धरणाच्या तिनही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस कोसळल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाने सर्वच रस्ते जलमय झाले, ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली, नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता बंद झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तर शिवणे इथं पुलावरून एक तरुण वाहून गेला. पुणे वेधशाळेनं दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहर आणि परिसरात मुसळधारांची शक्यता आहे.
Latest Videos
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

