Video : ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक
पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज नवीन बोगद्याच्या आसपासच्या परिसरातील डोंगरांवर भीषण वणवा (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यात आसपासचे संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक झाले आहेत.
पुणे : पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज (Katraj) नवीन बोगद्याच्या (Tunnel) आसपासच्या परिसरातील डोंगरांवर भीषण वणवा (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यात आसपासचे संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक झाले आहेत. वणव्यामुळे डोंगरांवर रोषणाई केल्यासारखे दृश्य दिसत होते. वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे डोंगरावर असणाऱ्या करवंद, बोरं, आंबा याबरोबरच इतर जंगली वनस्पती आणि फळे वाया जात आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान यामुळे झाले आहे. त्याचबरोबर सरपटणारे प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. वणव्यांपासून वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून आणि पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याने अशावेळी तो विझवणेही अवघड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

