डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडीला वणवा, अग्निशमन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात

कल्याण शीळ रोड लगत असलेल्या उंबार्ली टेकडीजवळी जंगलातील गवताला शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. तासाभरात आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. उंबार्ली टेकडीचा भाल गावाच्या दिशेने असलेल्या बाजूने हा वणवा पेटला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. तब्बल दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडीला वणवा, अग्निशमन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात
डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडीला वणवा. अग्निशमन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली आहे.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 8:14 AM

डोंबिवली : येथील कल्याण (Kalyan) शीळ रोड लगत असलेल्या उंबार्ली टेकडीजवळी जंगलातील गवताला शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग (fire) लागली. तासाभरात आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. उंबार्ली टेकडीचा भाल गावाच्या दिशेने असलेल्या बाजूने हा वणवा पेटला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या (fire brigade)  पथकाने आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. तब्बल दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, या आगीत अनेक झाडांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरम्यान, डोंबिवलीजवळी असलेली ही टेकडी ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या टेकडीवर सकाळी आणि सायंकाळी चालण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते. पर्यावरण प्रेमी आणि वनविभागाकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं आहे. पक्षांची देखील रेलचेल या ठिकाणी दिसून येते. मात्र, टेकडीवर या आधी देखील अशा प्रकारे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

यापूर्वी देखील आगीच्या घटना

डोंबिवली जवळील कल्याण शीळ रोडलगत असलेल्या उंबार्ली टेकडीजवळील जंगलात यापूर्वी देखील आग लाण्याच्या घटना घडल्या आहे. ही टेकडी ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी पर्यावरण प्रेमींची देखील ये-जा असते. तर या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी लोक येत असतात. मात्र, या टेकडीला भाल गावाच्या दिशेनं असलेल्या बाजूनं अचानक वनवा पेटल्याचं शनिवारी सायंकाळी दिसून आलं. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

ऑक्सिजन हब धोक्यात?

उंबार्ली टेकडी आणि परिसर ऑक्सिजन हब म्हणून ओळखला जातो. याठिकाणी हिरवळ असल्यानं आणि शांत वातावरण असल्यानं लोक फिरण्यासाठी येत असतात. झाडे आणि निसर्ग संपन्नता देखील याठिकाणी दिसून येते. मात्र, आता आणि यापूर्वी देखील वणव्याचे प्रकार घडले असल्यानं पुन्हा एकदा या परिसराकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

इतर बातम्या

हृतिक रोशन-सबा आझाद करणार लग्न? कुटुंबीयांसोबत वाढतेय जवळीक

दिवसभर घरीच असेल कधीही या, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; पोलीस सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार

Home Loan Tax Benefits : होम लोनवर टॅक्स वाचवण्याचे तीन सोपे उपाय, दीड लाखांपर्यंत होऊ शकतो फायदा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.