Katrina Kaif : एकतर्फी प्रेम! अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला बेड्या
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मनविंदर सिंह असं या आरोपीचं नाव आहे. मनविंदर सिंह हा स्ट्रगलिंग अभिनेता असल्याचं कळतंय.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मनविंदर सिंह असं या आरोपीचं नाव आहे. मनविंदर सिंह हा स्ट्रगलिंग अभिनेता असल्याचं कळतंय. कतरिनाशी लग्न करण्याची मनविंदरची इच्छा होती. एकतर्फी प्रेमातून त्याने तिला स्टॉक केलं, अशी माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर धमकी मिळताच विकीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मनविंदर गेल्या काही दिवसांपासून सतत कतरिनाला स्टॉक करत होता. मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून तो स्ट्रगलिंग अभिनेता आणि कतरिनाचा मोठा चाहता आहे. त्याला कतरिनासोबत लग्न करायचं होतं आणि त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून तो तिला सोशल मीडियावर सतत त्रास देत होता.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

