AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Keshav Upadhye | मागील 2 वर्षापासून गुन्हेगारीकडे सरकारचं दुर्लक्ष - केशव उपाध्ये

Keshav Upadhye | मागील 2 वर्षापासून गुन्हेगारीकडे सरकारचं दुर्लक्ष – केशव उपाध्ये

| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 6:41 PM
Share

दहशतवादी कारवायांचे अनेक कट केंद्रीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येऊनही, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात मात्र ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून गुंडाळून ठाकरे सरकारने मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात आणली आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मंत्र्यांच्या सरबराईसाठी ठाकरे सरकारने पोलीस यंत्रणेस वेठीस ठरल्याने राज्यातील जनतेची सुरक्षा संकटात सापडली आहे. दहशतवादी कारवायांचे अनेक कट केंद्रीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येऊनही, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात मात्र ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून गुंडाळून ठाकरे सरकारने मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात आणली आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या सप्टेंबरमध्ये जोगेश्वरी येथून झाकीर शेख या संशयितास अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने या पथकास सहकार्य सुरू केले, आणि मुंब्रा येथून रिझवान नावाच्या संशयितास अटक केली. वांद्रे येथेही एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच मुंबईत घातपात घडविण्याचे कट उघडकीस आले. एका भंगारवाल्याकडे युरेनियमचा साठा सापडतो, त्याच्या तपासातून काय निष्पन्न झाले, असा सवाल त्यांनी केला.