महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान सोहळ्याला राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन आमदारांची उपस्थिती
Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; राष्ट्रवादीचे दोन आमदार उपस्थित, पाहा व्हीडिओ...
खारघर : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 लाख श्री सदस्य नवी मुंबईत दाखल झाले आहेत. लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे दोन आमदार उपस्थित आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे तसंच आमदार अनिकेत तटकरे या स सोहळ्याला उपस्थित आहेत. तरुण-तरुणींना योग्य मार्ग दाखवण्याचं काम आप्पासाहेबांच्या माध्यमातून होत असतं. त्यांचे विचार अनेकांना मार्गदर्शक ठरतात. इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यात राजकारण आणण्याची गरज नाही, असं आदिती तटकरे यावेळी म्हणाल्यात.
Published on: Apr 16, 2023 10:28 AM
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
